Maharashtra Heavy Rain Loss : अवकाळी आणि गारपिटीने पिकांची नासाडी

Continues below advertisement

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यात 34 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर अचूक आकडेवारी समोर येतील, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, असंही ते म्हणाले.. कृषी आयुक्त चव्हाण हे स्वतः नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले.. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला... दरम्यान, अवकाळीमुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झालंय.. नाशिक जिल्ह्यात ८ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात ७ हजार ३०५ हेक्टरवरील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड ,आंबा ,झेंडू आणि इतर पिकांचं नुकसान झालंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram