Maharashtra Heat Wave :पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रातील तापमान ABP Majha
Continues below advertisement
पुढील ३ ते ४ दिवसात महाराष्ट्रातील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसनं वाढणार आहे...मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. अहमदनगर, जळगाव, सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत तापमान वाढण्याचा अंदाज आहे.. अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि यवतमाळसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय.. आज चंद्रपुरात ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय...गेल्या ५० वर्षात मार्च महिन्यात चंद्रपुरात नोंदलं गेलेलं हे सर्वाधिक तापमान आहे.. अमरावतीत आज ४१.८ अंश, सोलापुरात ४२. ८ अंश तर परभणीत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय..
Continues below advertisement