राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार : राजेश टोपे
राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार अशी चार हजार पदे भरली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.