Health Department Exam Date : आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार परीक्षा
Continues below advertisement
Maharashtra Health Dept Exam Date Update : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली होतीय यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.
ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही याबद्दलची साशंकता होती. राजेश टोपे यांनी आज मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील, असे सांगितले होते. त्यानुसार 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.
Continues below advertisement