Maharashtra Hanuman Jayanti 2023 : अमरावती, अंजनेरी, कोल्हापुरातील हनुमान जयंतींचा आढावा

Continues below advertisement

अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे... यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार असून हजारोंच्या संख्येने महिला हनुमान चालीसा पठणाला हजेरी लावणार आहेत... भजन गायक शैलेंद्र भारती हे हनुमान चालीस पठण करणार आहे.. तसेच अमरावतीतील छत्री तलाव परिसरातील १० एकर जागेत १११ फूट उंच हनुमानाची मूर्ती साकारली जाणार आहे... याबाबतची एक चित्रफीत देखील दाखवली जाणार आहे... 

आज हनुमान जयंती... हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते...हनुमान जयंती निमित्तानं अंजनेरी गावातील श्री सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली... तसच या 11 फुटी मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आलं.. आज पहाटे वाजत - गाजत मिरवणूक काढण्यातही आली. सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा उत्साहात पार पडला, आणि भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुलं करण्यात आलं. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्तगण दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमानच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेलाय..

कुस्तीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातदेखील हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे... कोल्हापुरातील कुस्तीच्या तालमींमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे... गंगावेश तालमीमध्ये हनुमान जयंतीची तयारी पूर्ण झालीये... कुस्तीच्या आखाड्यात शंकराची पिंड तयार करुन त्याची पूजा करण्यात आलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram