Maharashtra Hailstorm : राज्यात गारपीट आणि पावसाचा रबी पिकांना फटका, शेतकरी हवालदिल ABP Majha
Continues below advertisement
वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्र गडबडल्याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. राज्याच्या विविध भागात आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काल विदर्भ, मराठावाड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटी झाली. औरंगाबाद, नागपूर, वाशिम, अकोल्यास जवळपास अकरा जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेय. शेतात असलेल्या हरभरा तसेच गव्हाच्या पीकांच नुकसान झालं आहे. संत्र्याच्या बागांनाही या पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय. सध्या तूर काढणीचा हंगाम आहे.. या पावसामुळे भाज्यांचंही मोठं नुकसान झालंय.
Continues below advertisement