Maharashtra Guardian Minister : शिंदे-फडणवीस सरकार पालकमंत्र्यांची नियुक्ती कधी करणार?

Continues below advertisement

पालकमंत्र्याविना महाराष्ट्रातले जिल्हे अनाथ आहेत आणि विकास पोरका झालाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही... कारण महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन दोन महिने उलटले मात्र अजूनही पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही.. त्यामुळे विकास आराखड्याची अंमलबजावणी रखडलेली आहे... पालकमंत्री हा वेगवेगळ्या २९ समित्यांचा प्रमुख असतो.. तसंच जिल्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयासाठी त्याला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते... मात्र सत्तांतरानंतर नव्या सरकारनं पालकमंत्रीच न नेमल्यानं सगळं काही अवघड होऊन बसलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram