Maharashtra Gram Panchayat : 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान
एकीकडे महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा असताना डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींची निवडणूक काल राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलीय. राज्यभरातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली. या ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासह निवडणूक होणार आहे. यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ७०४ ग्रामपंचायती आहेत.