Maharashtra Lockdown | राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचं कळतं. जर रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. वेळीच लॉकडाऊन केलं नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाउन दरम्यान कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.