Maharashtra Govt Exam paper leak : राज्यात आणखी एका परीक्षेत गैरव्यवहार? Special Report
राज्यात शासकीय भरती परिक्षांमध्ये पेपरफुटीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीय. आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेपासून सुरु झालेलं सत्र आता टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेपर्यंत येऊन दाखल झालंय. राज्यात टीईटीच्या परिक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं आता उघडकीस आलं आहे. म्हाडाच्या भरती परिक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रितेश देशमुखांना अटक करण्यात आली होती. टीईटी परिक्षेची जबाबदारीही याच कंपनीवर देण्यात आली होती. त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशयाचं धुकं निर्माण झालंय. पाहूयात टी ई टी परिक्षेच्या गैरव्यवहारासंदर्भात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.