Holi 2022 : होळी आणि धुळवड धुमधडाक्यात साजरी होणार, महाराष्ट्रात निर्बंध शिथिल
Holi Guidelines : कोरोना व्हायरसचं (coronavirus) प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 आणि 18 तारखेला होळी, धुलिवंदनचा सण साजरा केला जाणार आहे. होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या परिपत्रकामुळे होळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.