Omicron : ओमिक्रॉनला दुर ठेवण्यासाठी मुंबईत हालचाली, जम्बो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित
Continues below advertisement
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूविरोधातल्या लढाईत मुंबईला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईत नवा जम्बो ऑक्सिजन प्लान्ट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पूर्व उपनगरातल्या माहुल परिसरात ऑक्सिजन प्लान्टला भेट देऊन तिथल्या कामाचा आढावा घेतला. भारत पेट्रोलियम आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं लवकरच सुरू होणाऱ्या या प्लान्टमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे.
Continues below advertisement