Mega Bharati | मेगाभरतीचा मुहूर्त ठरला, 20 एप्रिलपासून भरतीची शक्यता
राज्यातील शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित झाली आहे. एबीपी माझाने राज्यातील शासकीय विभागांमधील जवळपास दोन लाख पदं रिक्त असल्याची बातमी दाखवली होती. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने नोकरभरतीचा मुहूर्त ठरवला आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.