Maharashtra : शासकीय - निमशासकीय कंत्राटी नोकरभरती खासगी कंपन्यांमार्फत होणार,नऊ कंपन्यांना कंत्राट

Continues below advertisement

शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती ही मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत केली जाणार आहे. तसा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांनी घेतला आहे.. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आहे.  आता या धोरणाची व्याप्ती वाढवत सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सरकारसोबतच निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारशी सबंधित अन्य कार्यालयातील बाह्य यंत्रणेमार्फत नोकरभरती केली जाणार आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram