Sengol Controversy | सरकारी जाहिरातीत सेंगोल वापरल्यावर काँग्रेसचा आक्षेप
महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोकस्तंभ राजमुद्रेऐवजी सेंगोल छापण्यात आला आहे. आणिबाणीला पन्नास वर्षे झाल्यानिमित्तानं संविधानहत्या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमातही सेंगोलचा वापर करण्यात आला. काँग्रेसने सरकारची कृती संविधानविरोधी असल्याची टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना प्रश्न विचारला, "तुम्हाला १९७५ ची आणिबाणी मान्य आहे का, ते आधी सांगा."