Scholarships : राज्यात शिष्यवृत्तींमध्ये मोठी घट, बार्टी संस्थेकडून फक्त 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
Continues below advertisement
सरकारच्या विविध संस्थांअंतर्गत ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्याच्या संख्येत मोठी घट करण्य़ात आली आहे. बार्टी संस्थेकडून आता ८६१च्या ऐवजी २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, तर सारथीमधील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ६०० वरून पन्नासवर आणण्यात आली आहे. महाज्योतीमध्ये बाराशेवरून ५०, टीआरटीआय १४६च्या ऐवजी १०० जणांनाच शिष्यवृत्ती देण्य़ात येणार आहे. सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.
Continues below advertisement