Anil Deshmukh यांच्यावरील भ्रष्टाचार आरोपांप्रकरणी राज्य सरकार सीबीआयला सर्व कागदपत्रं सोपवणार
सीबीआय विरुद्ध राज्य सरकार संघर्षाला नवं वळण आलंय. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारनं सर्व कागदपत्रं सीबीआयला देण्य़ाची तयारी दाखवली आहे. यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचाही समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा वापर फक्त अनिल देशमुखांसंबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी व्हावा, अशी अटही राज्य सरकारनं घातल्याचं कळतंय.