VSI Inquiry Row: 'चौकशी नाही, तक्रारी आल्या म्हणून अहवाल मागवला', Chandrashekhar Bawankule यांचे स्पष्टीकरण
Continues below advertisement
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीच्या आदेशावरून सध्या राजकारण तापले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही, तक्रार आल्यावर चौकशी करावी लागते, यात घाबरण्याचे कारण नाही', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्हीएसआयला (VSI) मिळणाऱ्या अनुदानाच्या वापराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती याचा तपास करून शासनाला अहवाल सादर करेल. दुसरीकडे, हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement