Cyber Fraud: 'तुम्ही Tax भरलेला नाही', Sambhajinagar मध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) बनावट कॉल सेंटरवर (Fake Call Center) पोलिसांनी छापा टाकला असून, पोलीस उपायुक्त (DCP) प्रशांत स्वामी (Prashant Swami) आणि पंकज अतुलकर (Pankaj Atulkar) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 'तुम्ही टॅक्स भरलेला नाही', असे सांगून नागरिकांची सायबर फसवणूक (Cyber Fraud) केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गरवारे स्टेडियमजवळ असलेल्या आयटी सेंटरमधील या कॉल सेंटरवर १०० हून अधिक पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकली. या ठिकाणी १०० हून अधिक महिला कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून, नागरिकांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. हे कॉल सेंटर कसे चालवले जात होते आणि त्याद्वारे नेमकी कशाप्रकारे फसवणूक केली जात होती, याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement