Maharashtra Education : राज्यातील शालेय शिक्षणात केरळ पॅटर्न, तिसरीपासून होणार सराव परीक्षा
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न (Kerala Education Pattern) राबविण्यात येणार आहे. केरळ सोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यातील शिक्षणातील पॅटर्न मधील यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या तयारीत आहे. केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.
Continues below advertisement