Maharashtra : Lockdown नाही पण कठोर निर्बंध येणार, आज रात्री नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता

Coronavirus in Maharashtra :  राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत होत असताना सरकारने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सरकारने काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आता होम क्वारंटाइनचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला आहे. या आधी हा कालावधी 10 दिवसांचा होता. सात दिवसांच्या होम क्वारंटाईननंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola