Chandrapur Liquor Ban Lifted : चंद्रपुरातील दारुबंदी उठवली, महिलांकडून निषेध
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 1 एप्रिल, 2015 पासून दारुबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वाढलेले अवैध दारुचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला, असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. शासनाने 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारु विक्रीचे आणि दारु पिण्याचे परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यत दारूबंदी लागू केली होती. परंतु या निर्णयाला चंद्रपुरातील महिलांनी तीव्र विरोध केला आहे.
Continues below advertisement