Child Vaccination : केंद्राकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही : Rajesh Tope
जालना : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 11 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे त्यांचं लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे आग्रह धरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.