Farmers:राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज, मराठवाड्याला किती रुपये मिळणार?
Continues below advertisement
राज्य शासनानं राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज तातडीची मदत म्हणून जाहीर केलं आहे. अतिवृष्टीमुळं मराठवाड्यात 47 लाख शेतकऱ्यांच्या पिकांंचं नुकसान झालं आहे. राज्य शासनानं जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाडा विभागाला 3 हजार 762 कोटी रुपये मिळणार आहेत. वाढीव दरानं मदत देण्याबाबत शासनानं 21 ऑक्टोबर रोजी अध्यादेश काढला आहे. येत्या आठवड्यात हे 3 हजार 762 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ बैठक झाली होती , त्यानंतर आठवडाभराने अध्यादेश निघाला आहे.
Continues below advertisement