Maharashtra Ganeshotsav 2022 : यंदा धुमधडाक्यात उत्सव! गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा राज्यात गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम हे सर्म निर्बंधविना साजरे होणार आहेत... कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेले सण यंदा मात्र निर्विघ्न पार पडण्याची अपेक्षा आहे.... या सणांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातली कोरोना स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती याचा आढावा आढावा घेण्याचाशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मागील दोन वर्षापासून दहीहंडी,गणेशोत्सव, मोहरम हे सण कोरोनाच्या सावटात पार पडले. मात्र आता त्यानंतर यंदा निर्बंधांंचं विघ्न असणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. यासोबतच सरकारनं गणेशोत्सवात मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध हटवण्याचा निर्णयही घेतलाय . मूर्तीकारांसाठीही हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे सर्वच मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण असून सणांसाठी तयारीची लगबगही सुरू झालेय.