Maharashtra FYJC Admission CET 2021 :अकरावी प्रवेशाच्या CETसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी
दहावीच्या निकाल मिळण्यात अडचणींचा सामना करणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठीही ऑनलाईन अडचणी येत आहेत. सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना वेबसाईट ओपन होत नाही. आणि वेबसाईट ओपन झालीच तर भरलेली माहिती पुढे जात नाही. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले असून २७ जुलैपर्यंत अर्ज कसा भरायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.