Maharashtra Solapur Floods: Seena नदीच्या महापुराने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, Documents चा चिखल

Continues below advertisement
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आले आहे. पुराच्या पाण्यात अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्ये वाहून गेली आहेत, तर कागदपत्रांचा चिखल झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिढे गावातील विक्रम चंदनशिवे या विद्यार्थ्याला याचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्याने घरातील कागदपत्रांची सुटकेस बाहेर काढली. शालेय जीवनापासून जमवलेल्या कागदपत्रांपासून ते बी ए प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या फॉर्म्सपर्यंत सर्व कागदपत्रे पूर्णपणे भिजली होती. विक्रम चंदनशिवे यांनी सांगितले की, "माझं आता ओरिजिनल एलसी पूर्ण भिजलेलं आहे. माझं कास्ट सर प्रिटिकेट आणि रेशन कार्ड भिजलेलं आहे. जे मला अत्यावश्यक होते अडमिशनसाठी ती माझी कागदपत्रं पूर्ण भिजलेलं आहेत." दहावी, अकरावी आणि बारावीची गुणपत्रकेही पुराच्या पाण्यात खराब झाली आहेत. यामुळे त्याच्या बी ए प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola