Ahilyanagar Protest | अहिल्यानगरमध्ये दगडफेक, 39 जणांना अटक; Owaisi सभेला परवानगी नाही?
Continues below advertisement
अहिल्यानगर शहरात काल झालेल्या दगडफेक प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास दोनशे जणांवर गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केले आहेत. दगडफेकीत सात पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत एकोणचाळीस जणांना ताब्यात घेतले आहे. कोटला परिसरात आक्षेपार्ह रांगोळीवरुन मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना दोन वेळा लाठीचार्ज करावा लागला. रस्त्यावर 'आय लव मोहम्मद' अशी रांगोळी काढल्याचा आरोप करत आंदोलन झाले. जमावाने तोडफोड आणि रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. अहिल्यानगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज सभा होणार होती, तसेच वक्फ बोर्डाची बैठकही नियोजित होती. मात्र, कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सभेसाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. ओवैसींच्या कोल्हापूर दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, ज्यावर ओवैसींनी प्रत्युत्तर दिले होते. ओवैसी म्हणाले, "आप बच्चे तुम्हारे मुंह के अंदर दूध के दांत भी नहीं निकले अभी याद रखो मौत से डरने वाले का नाम असदुद्दीन ओवैसी नहीं है। मैं अल्लाह को हाजिर नाजिर जान के बोलो मैं मरने तैयार हूं, तुम तैयार हो मरने को".
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement