Farmers' Agitation: 'हीच कर्जमाफीची योग्य वेळ, सरकारने आता शब्द फिरवू नये', Ajit Navale यांचा इशारा

Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि अजित नवले (Ajit Navale) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. 'कर्जमाफीची मुख्य मागणी आम्ही लावून धरणार आहोत कारण शेतकरी फार अडचणीत आहे, हीच कर्जमाफीची योग्य वेळ आहे,' असा थेट इशारा अजित नवले यांनी सरकारला दिला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर निर्णायक चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीच्या निर्णयावरच नागपुरातील आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola