Zero Hour Farmer Karjmafi : शेतकरी कर्जमाफी, ३० जूनच्या डेडलाइनचं काय होणार? ABP Majha
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून, सरकारच्या वतीने आशिष शेलार यांनी भूमिका मांडली आहे, तर उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 'आज कर्जमाफी केल्याने ही पूर्ण रक्कम बँकेत जाईल, परंतु ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाकणं जास्त महत्त्वाचं आहे', असे म्हणत आशिष शेलार यांनी सरकारची प्राथमिकता स्पष्ट केली. ३० जूनपर्यंत कर्जमाफी देण्याच्या घोषणेवरून बच्चू कडू आक्रमक आहेत, मात्र शेलार यांनी थेट उत्तर देणे टाळले. कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद आणि नवीन अर्थसंकल्पाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांना थापा मारून वेळ काढत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ९ हजार कोटी रुपये जमा केले असून, ही मदत कर्जमाफीपेक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे शेलार यांनी म्हटले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement