Powai Hostage Crisis: 'नुसता रोहितच नाही, सगळी टीम सामील', प्रत्यक्षदर्शी आजीच्या दाव्याने खळबळ
Continues below advertisement
मुंबईच्या पवईमधील (Powai) ओलीस नाट्य आणि त्यानंतर पोलीस एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) ठार झालेला रोहित आर्य (Rohit Arya) या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. 'सरकारी बिलाचा संबंध नाही, केवळ सहानुभूतीपोटी ८.२६ लाखांचा चेक दिला होता', असा खुलासा माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. एकेकाळी सरकारच्या 'माझी शाळा, सुंदर शाळा' योजनेचा पोस्टर बॉय असलेला रोहित आर्य, सरकारच्या 'प्रोजेक्ट लेट्स चेंज'चा (Project Let's Change) प्रकल्प संचालक होता. मात्र, सरकारकडे पैसे थकल्याने आणि वारंवार मागणी करूनही ते न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केसरकरांनी दिलेल्या वैयक्तिक चेकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका आजीने रोहितसोबत आणखी लोक असल्याचा दावा केल्याने प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement