Farmer Aid Row: 'शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही', मंत्री Makrand Patil यांचा प्रशासनाला सवाल

Continues below advertisement
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) शेतकरी मदतीच्या वाटपावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री मक्रंद पाटील (Makrand Jadhav Patil) आणि प्रशासनात वाद पेटला आहे. 'सरकारकडून देण्यात आलेली मदत तुम्ही म्हणता पोहोचली, जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली, पण शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही', असा थेट सवाल मंत्री मक्रंद पाटील यांनी बैठकीत उपस्थित केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) हस्तक्षेप करत वाद मिटवला आणि मुख्य सचिवांना आजच आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले. या बैठकीत आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मदत मिळाली, किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, याचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. मदत वाटपाच्या आकडेवारीवरून प्रशासन आणि मंत्र्यांमध्ये निर्माण झालेल्या या विसंवादामुळे सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola