Viral Video: 'शिकारी' बिबट्याची झाली शिकार? नवेगाव-नागझिरात अस्वल दिसताच leopard ची 'बोबडी वळली'!
Continues below advertisement
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (Navegaon-Nagzira Tiger Reserve) एक दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जिथे एक बिबट्या (Leopard) आणि अस्वल (Bear) आमनेसामने आले. 'मात्र नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात झुडपातून रस्त्यावर आलेल्या बिबट्याच्या पुढे अचानक भलमोठं अस्वल दिसलं आणि बिबट्याची बोबडी वळली'. शिकारीच्या तयारीत असलेला बिबट्या, स्वतःपेक्षा मोठ्या अस्वलाला पाहून इतका घाबरला की आपलीच शिकार होते की काय या भीतीने तो रस्त्यातच थांबला. काही क्षणांनंतर, अस्वल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत निघून गेले. त्यानंतर घाबरलेल्या बिबट्यानेही तिथून चोर पावलांनी जंगलात धूम ठोकली. हा संपूर्ण थरारक प्रकार काल रात्री एका निसर्ग अभ्यासकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, ज्याचा व्हिडीओ आता चर्चेचा विषय ठरत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement