Maharashtra Fake Crop Insurance Issue: महाराष्ट्रात बोगस विम्याचं भरघोस पीक

Continues below advertisement

Onion Insurance fraud: महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पीक विमा उतरवण्यात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. पुणे,अहिल्यानगर ,धुळे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली नसताना पिकाचा पिमा उतरवला आहे. अनेक ठिकाणी कमी क्षेत्र असताना कांद्याची लागवड जास्त दाखवून  विमा उतरवल्याचंही समोर आलंय.  या आठ जिल्ह्यात 4 लाख 2398 शेतकऱ्यांनी दोन लाख 24 हजार 318 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली आहे. यात 83 हजार 911 शेतकऱ्यांनी 49 हजार 935 हेक्टरवर कांदा लागवड न करताच  विमा उतरवल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 60285 शेतकऱ्यांनी 28 हजार 86 हेक्‍टरवर कमी क्षेत्रात असताना देखील अधिकच्या क्षेत्रावर कांदा दाखवत  विमा उतरवला. कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख 47 हजार 272 शेतकरी अपात्र करण्याच्या करणार सूचना विमा कंपन्यांना करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पेरणी क्षेत्र अन् जास्त विमा घेतलेले अर्ज

जिल्हा          पेरणी क्षेत्र   अधिकचा विमा काढलेले अर्ज

पुणे               6,748      5 ( 11.33 हे)
अहिल्यानगर  23, 484      5.101
धुळे                    530     178
सातारा             1796      18513
नाशिक               164      778
छ. संभाजीनगर  2337      8516
बीड                 4659
सोलापूर            37230     36437

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कांदा पीक क्षेत्र तपासणी अहवालानुसार, अधिकचे लागवड क्षेत्र दाखवून पीक विम्याची संरक्षिक केलेले अर्ज हे सोलापूर, सातारा, संभाजीनगर, नाशिकमध्ये सर्वाधिक असल्याचं या आकड्यांवरून दिसतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram