Electricity Bill Cut | महाराष्ट्रात वीजदर कमी होणार, पाच वर्षात सव्वीस टक्के कपात
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीजदर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के आणि पाच वर्षात सव्वीस टक्के वीजदर कमी होणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली होती.