shikshan Utsav | ऐन परीक्षेच्या काळातच राज्यभरात शिक्षणोत्सव घेण्याचा शिक्षण विभागाचा आदेश
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. 23 मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत तर यानंतर आठवी, नववीच्या शाळांत परीक्षांना प्रारंभ होणार आहे. मात्र असं असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक अजब निर्णय घेतला आहे. या निर्णय म्हणजे शिक्षणोत्सवचा. परीक्षा काळात प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर हा शिक्षणोत्सव घेण्याचे आदेश आणि त्यासाठी लागणारा निधी ही वितरित करण्यात आला आहे. मात्र परीक्षा काळात शिक्षण विभागातील सर्वच अधिकारी आणि शिक्षकांना या शिक्षणोत्सवासाठी विद्यार्थी येतील का असा प्रश्न पडला आहे.