Devendra Fadnavis On Ranjit Nimbalkar: प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांकडून निंबाळकरांना क्लीन चीट

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैठण येथील भाषणात डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली आहे, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. 'प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याचा राजकारण कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाहीत', असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. आमच्या भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देतानाच फडणवीसांनी निंबाळकर यांचे कौतुक केले आणि आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले. या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांच्या क्लिन चिटनंतर, 'मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले आहेत का?' असा सवाल करत दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola