Satara Doctor Death: 'ही आत्महत्या नाही, हत्या आहे', Rahul Gandhi यांची गंभीर एक्स पोस्ट

Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी साताऱ्यातील (Satara) महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी तीव्र शोक व्यक्त करत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. 'ही आत्महत्या नसून हत्याच आहे', अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली आहे. इतरांच्या वेदना कमी करणारी एक होतकरू डॉक्टर गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरल्याचे ते म्हणाले. त्यांच्या मते, भाजपशी संबंधित व्यक्तींनी त्या डॉक्टरवर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेने संरक्षित केलेल्या गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात भयंकर उदाहरण आहे, असेही गांधींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये (X Post) म्हटले आहे. न्यायाच्या या लढाईत पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola