Eknath Shinde On Foresst Department : 'यानंतर एकही मृत्यू होता कामा नाही', उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा वनविभागाला इशारा
Continues below advertisement
पुण्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) १३ वर्षीय रोहन बोंबे (Rohan Bombe) याचा मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. 'झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि यानंतर एकही मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होता कामा नाही,' असा सक्त इशारा शिंदे यांनी वन विभागाला दिला आहे. यापुढे अशी घटना घडू नये यासाठी कडक खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गेल्या २० दिवसांत शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अखेर, मंगळवारी रात्री वन विभागाच्या शार्प शूटर्सनी एका नरभक्षक बिबट्याला ठार केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement