Devendra Fadnavis On Parht Pawar: पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील महार वतन जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे आणि योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत,' असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण गंभीर दिसत असून, चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. अजित पवार अशा प्रकरणांना पाठीशी घालणार नाहीत, असेही ते म्हणाले. सुमारे ४० एकर सरकारी जमिनीच्या या व्यवहारप्रकरणी एका उपनिबंधकाला निलंबित करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola