Dam Water Storage : पाऊस फुल, धरणं हाऊसफुल्ल! मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो

पावसाच्या नॉन स्टॉप बॅटिंगमुळे मुंबई, पुणे, नाशिक मधली धरणं भरली आहेत तर अनेक धरण ओव्हर फ्लोव झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे. पालघर जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100% भरलं आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर, दारणा, पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरण विसर्ग सकाळी 9 वाजता एकूण 2500 cusec करण्यात आलाय. पालखेड  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणातून 800 क्यू सेक्स विसर्ग करण्यात आलाय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola