Maharashtra Crop Loss | गुडघाभर पाण्यातून Soybean काढताना शेतकरी; रब्बी हंगामाची चिंता

Continues below advertisement
धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गावशिवारामध्ये गुडघाभर पाण्यातून शेतकऱ्याला Soybean काढावं लागतंय. अतिवृष्टीमुळे कांडणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत. वर्ध्याच्या Hinganghat, Samudrapur आणि Deoli भागामध्येही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दीड लाख हेक्टर शेतीपिकावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर रब्बीतील गहू आणि हरभरा पेरायचा कसा, असा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांनी Soybean काढण्याऐवजी ते जाळून टाकण्याचा निर्णय घेतला आहे कारण बाजारात त्याला योग्य भाव मिळत नाहीये. शासनाने आम्हाला तत्काळ मदत द्यावी, हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समुद्रपूर तालुक्यातील वाशीकोरा गावातल्या शेतकऱ्यांची आहे. 'एकही रुपयाचं Soybean आमच्या हातात येणार नाहीये', अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola