Maharashtra Lockdown Updates| राज्यात कोरोना झपाट्यानं वाढतोय;'या' मुख्य शहरात लॉकडाऊनची काय स्थिती?
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या प्रमुख शहरांबरोबरच राज्यातल्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतेय. पण कोरोनाच्या या संकटात मुंबई आणि पुणेकरांना मात्र प्रशासनानं दिलासा दिलाय. मुंबईत लॉकडाऊन करण्याचा सध्यातरी विचार नाही, असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलाय. नागरिकांनी त्रिसूत्री पाळली तर लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही असं काकाणी म्हणालेत. तिकडे पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिककरांना मात्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. अंशतः लॉकडाऊन असतानाही नाशिककरांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंधांचे संकेत दिलेत. तिकडे नागपुरात पालकमंत्र्यांनी 15 ते 21 मार्चदरम्यान लॉकडाऊन लावलाय. याला भाजप आणि व्यापाऱ्यांनी विरोध केलाय.