Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय! मंगळवारी 2172 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Continues below advertisement
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2172 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1098 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने दोन हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 4 हजार 831 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे.
Continues below advertisement