Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ, गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढण्याची भीती
राज्यात आज 3,783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे.