College Reopen : आजपासून महाविद्यालयं सुरु, लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. तर, यासोबतच कृषी महाविद्यालयंही आजपासून सुरु होणार आहेत. महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक असणार आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.