Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय, आकडा 2 हजार पार

Continues below advertisement

राज्यात एकीकडे सण निर्बंध मुक्त होत असताना साथीचे आजार मात्र बळावायला लागले आहेत.... 
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसतोय..  राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजारांच्याही पुढे गेलाय त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे...आतापर्यंत 2285 नव्या रुग्णांचं निदान झालंय. 
त्यात कालच्या दहीहंडी उत्सवात कुठलेच निर्बंध नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे.. तर दुसरीकडे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने डोकं वर काढल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झालीये... नाशिक शहरात एका महिन्यात 11 जणांचा स्वाईन फ्लू्मुळे मृत्यू झालाय...  मृतांमध्ये नाशिक शहरातील 3, नाशिक ग्रामीणमधील  4, अहमदनगरमधील 3 आणि पालघरच्या एका रुग्णाचा समावेश आहे...नाशिक शहरात चालू ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 64 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालीये... स्वाईन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता  स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यास तातडीने उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram