Corona : दिलासादायक! काल राज्यातील 12 जिल्हे 12 पालिका क्षेत्रात एकही कोरोना मृत्यू नाही ABP Majha
Continues below advertisement
तिसऱ्या लाटेचा इशारा, डेल्टा व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आलीय. राज्यातील १२ जिल्हे आणि १२ महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. काल दिवसभरात कोरोनामुळे राज्यात १५७ जणांचा मृत्यू झाला. मात्र १२ जिल्हे आणि १२ महापालिका क्षेत्रातून दिलासा देणारी आकडेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केलीय. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात ६ हजार ४७९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झालीय. तर ४ हजार ११० रुग्णांनी कोरोनामुक्त झालेत. ही आकडेवारी दिलासा देणारी असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Maharashtra Corona Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Corona Death In Maharashtra