Maharashtra Corona : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, 2 ते 3 दिवसात सरकार नियमावली जाहीर करणार
देशात कोरोनाचा धोका वाढत चाललाय... तीन दिवसात देशातील कोरोना रुग्णसंख्या दुप्पट झालीये... कोरोना रुग्णसंख्येचा गुणाकार सुरू असून काल दिवसभरात तब्बल 10 हजार 158 कोरोनाबाधित आढळले आहेत.. तर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.... आठ महिन्यांनंतर रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा गाठला आहे. तर केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांत देशभरातील 66 टक्के रुग्ण आहेत.. दरम्यान नागरिकांनी खबरदारी घ्यावी, मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.