Maharashtra Corona : महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मास्कमुक्तीबाबत मुंबईकरांना काय वाटतं?

Continues below advertisement

मराठी नववर्षाचं स्वागत यंदा धुमधडाक्यात होणार आहे. नववर्षात महाराष्ट्र नव्या उमेदीनं सुरुवात करणार आहे. कारण तब्बल 736 दिवसांच्या कोरोना निर्बंधांच्या बेड्या तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजेच उद्यापासून महाराष्ट्राची जनता निर्बंधांविना मोकळा श्वास घेणार आहेत..  यात सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो मास्कमुक्तीचा. मास्क घालणं ऐच्छिक करण्यात आलंय. त्यामुळे एका अर्थी ही मास्कमुक्ती आहे असं म्हटल्यासही वावगं ठरणार नाही. मुंबईतील लोकल प्रवाशांनाही राज्य सरकारने दिलासा दिलाय. लोकल प्रवासासाठी असलेली दुहेरी लसीकरणाची अटक मागे घेण्यात आलीय. त्यामुळे आता मुंबईत लोकल प्रवास करताना लसीकरणाचा युनिव्हर्सल पास आवश्यक नसेल. भाविकांनाही सरकारने आनंदाची बातमी दिलीय. निर्बंध उठल्याने मंदिरांमधील दर्शनासाठी असलेले नियम हटवले जाणार आहेत. त्यामुळे दर्शनपास रांगेतून भाविकांची सुटका होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram